पोर्टफोलिओ विविधीकरणाचे फायदे काय आहेत

पोर्टफोलिओ विविधीकरणाचे फायदे काय आहेत zoom-icon

म्युच्युअल फंड सही आहे?

"सर्व अंडी एका टोपलीत कधीही ठेवू नका".

गुंतवणुकीचे निर्णय घेताना जोखीम आणि परतावा यातील समतोल साधणे महत्त्वाचे असते. हा समतोल साधण्यासाठी वैविध्यता (डायवर्सिफिकेशन) ही एक महत्त्वाची रणनीती आहे, कारण ती तुम्हाला तुमची गुंतवणूक विविध मालमत्ता वर्ग (असेट क्लास) आणि सेक्टर मध्ये वितरित करण्याची संधी देते आणि कोणत्याही एका विशिष्ट जोखीम संबंधित धोका/असुरक्षितता कमी करते.

या लेखात, आम्ही पोर्टफोलिओ विविधीकरण (डायवर्सिफिकेशन) काय असते, विशेषत: म्युच्युअल फंडाशी संबंधित, आणि ते तुम्हाला हवा असलेला गुंतवणुकीवरील परतावा मिळविण्यात तुम्हाला कसे मदत करू शकते ते पाहू.

पोर्टफोलिओ विविधीकरण (डायवर्सिफिकेशन) म्हणजे काय?
जेव्हा तुम्ही रात्रीच्या जेवणासाठी बाहेर जाता, तेव्हा जास्तीत जास्त समाधानासाठी तुम्ही बर्‍याच प्रकारच्या जेवणाची ऑर्डर देता. तुम्ही सूप, ॲपेटायझर, मेन कोर्स, डेझर्ट आणि कदाचित काही ड्रिंक्स ऑर्डर करू शकता. हे सुनिश्चित करते की तुम्हाला विविध प्रकारचे स्वाद आणि पोत मिळतात. तसेच, जर एखादा कोर्स समाधानकारक नसेल, तर दुसरा कोर्स त्याची चवहीनता भरून काढण्याची शक्यता असते.

अशाच पद्धतीने पोर्टफोलिओ विविधीकरणाचा विचार करा. पोर्टफोलिओ विविधीकरणामध्ये चांगल्या जोखीम-समायोजित परताव्यासाठी विविध साधनांमध्ये गुंतवणूक करणे समाविष्ट असते, म्हणजे जोखीम कमी करणे आणि परतावा वाढवणे. यामध्ये तुमची गुंतवणूक स्टॉक, बाँड, कमोडिटीज, रिअल इस्टेट आणि इतर पर्यायी गुंतवणुकीसारख्या मालमत्ता वर्गांमध्ये पसरवणे समाविष्ट असते. इक्विटी, डेट, कमोडिटीज यांसारख्या अनेक मार्केटमध्ये थेट खरेदी करण्याऐवजी तुम्ही एकाच म्युच्युअल फंड योजनेद्वारे सर्व मार्केटमध्ये गुंतवणूक करू शकता.

उदाहरणार्थ, मल्टी अ‍ॅसेट ॲलोकेशन फंड प्रत्येक वर्गात किमान 10% वाटप करून किमान तीन मालमत्ता वर्गांमध्ये गुंतवणूक करतात. त्याचप्रमाणे, मल्टी-कॅप फंड त्यांच्या गुंतवणुकीपैकी किमान 65% इक्विटी आणि इक्विटी-संबंधित साधनांमध्ये विविध क्षेत्रे आणि बाजार विभागांमधील समभागांमध्ये वाटप करतात. हे विविधीकरण कमी स्टॉक्स, सेक्टर्स किंवा सेगमेंट्सच्या जास्त एक्सपोजरशी संबंधित जोखीम कमी करण्यास मदत करते.

शिवाय, तुम्ही वेगवेगळ्या ध्येयांसाठी वेगवेगळ्या म्युच्युअल फंड योजनांमध्ये गुंतवणूक करू शकता. उदाहरणार्थ, तुम्ही अल्प-मुदतीच्या उद्दिष्टांसाठी डेट फंड, दीर्घकालीन उद्दिष्टांसाठी इक्विटी फंड आणि मध्यम मुदतीच्या उद्दिष्टांसाठी हायब्रिड फंडांमध्ये गुंतवणूक करू शकता.

यापैकी प्रत्येक फंड हा त्याच्या स्वतःच्या फायद्यांसह येतो आणि त्यांच्यात काही प्रमाणात जोखीम असते. जेव्हा तुम्ही तुमच्या उद्दिष्टांनुसार विविध म्युच्युअल फंडांमध्ये गुंतवणूक करता तेव्हा तुम्ही तुमच्या एकूण पोर्टफोलिओमधील जोखीम कमी करू शकता.

विविधीकरणामुळे विविध बाजार क्षेत्रातून फायदा मिळवण्याची संधी देखील मिळू शकते, ज्यामुळे जोखीम कमी करताना जास्तीत जास्त परतावा मिळण्यास मदत होते.

म्युच्युअल फंडांमध्येच, म्युच्युअल फंडांच्या काही श्रेणी आहेत जे अंतर्निहित वैविध्य प्रदान करतात. उदाहरणार्थ, मल्टी-कॅप फंड स्मॉल-कॅप, मिड-कॅप आणि लार्ज-कॅप कंपन्यांमध्ये वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये आणि उद्योगांमध्ये गुंतवणूक करतात. मल्टी-कॅप फंडांमध्ये गुंतवणूक केल्याने तुम्हाला कंपनीच्या इक्विटीच्या विस्तृत श्रेणीत प्रवेश मिळू शकतो. त्याचप्रमाणे, जर तुम्हाला जोखीम-संतुलित म्युच्युअल फंड गुंतवणूक हवी असेल, तर तुम्ही हायब्रीड फंडात गुंतवणूक करू शकता जो डेट आणि इक्विटी गुंतवणुकीत समान गुंतवणूक करतो.

तथापि, हे लक्षात ठेवा की विविधीकरण यशाची हमी देत ​​नाही किंवा तोटा संरक्षण देखील देत नाही. गुंतवणुकीचे निर्णय घेण्यापूर्वी म्युच्युअल फंड योजनांची गुंतवणूक उद्दिष्टे विचारात घ्या.

पोर्टफोलिओ विविधीकरणाचे फायदे काय आहेत?

1) जोखीम व्यवस्थापन
जेव्हा तुम्ही तुमच्या पोर्टफोलिओमध्ये विविधता आणता, तेव्हा तुम्ही खात्री करता की एक मालमत्ता वर्ग कमी कामगिरी करत असल्यास, इतर मालमत्ता भरपाई देऊ शकतात. सर्व मालमत्ता समान रीतीने कार्य करत नाहीत आणि विविधीकरणामुळे तुमचा धोका कमी होतो. उदाहरणार्थ, इक्विटी कमी कामगिरी करत असल्यास, डेट इन्स्ट्रूमेंट्स आणि सोने सामान्यत: चांगली कामगिरी करतील. तुम्ही वैविध्यपूर्ण म्युच्युअल फंडात गुंतवणूक करत असल्यास किंवा विविध मालमत्तांमध्ये म्युच्युअल फंड गुंतवणुकीचा समावेश असलेला पोर्टफोलिओ असल्यास, तुमची एकूण जोखीम आणि परतावा संतुलित केला जाईल.

2)  बाजारातील अस्थिरतेपासून संरक्षण
वैविध्यपूर्ण पोर्टफोलिओ पोर्टफोलिओची एकूण जोखीम कमी करतो. मालमत्ता वर्ग आणि उद्योगांमध्ये गुंतवणुकीच्या विविधीकरणामुळे बाजारातील अस्थिरतेचा एकूण परिणाम कमी होतो. रिटर्न्समधील उच्च अस्थिरता एक धोकादायक मालमत्ता सूचित करते आणि यामुळे, जोखीम असलेल्या मालमत्तेवरील परतावा सामान्यतः कमी जोखीम असलेल्या मालमत्तेवरील परताव्यापेक्षा जास्त असतो. उदाहरणार्थ, तुम्ही एकाच कंपनीच्या इक्विटी आणि बाँडमध्ये गुंतवणूक केल्यास, इक्विटीमधील गुंतवणुकीवर मिळणारा परतावा बाँडवरील गुंतवणुकीवरील परताव्यापेक्षा जास्त असेल. इक्विटीमध्ये जोखीम देखील जास्त असेल. जेव्हा तुम्ही तुमच्या पोर्टफोलिओमध्ये डेट आणि इक्विटी या दोन्हींचा समावेश करता, तेव्हा तुम्ही खात्री करता की एका मालमत्ता वर्गातील सकारात्मक परतावा कदाचित दुसऱ्या मालमत्ता वर्गाकडून कमी किंवा नकारात्मक परताव्याची भरपाई करू शकेल.

3) उद्दिष्टे
विविधीकरण तुम्हाला विशिष्ट आर्थिक उद्दिष्टे साध्य करण्यात मदत करू शकते. कालांतराने उद्दिष्टे बदलू शकतात; ते साध्य करण्यासाठी लवचिक गुंतवणूक धोरणांची आवश्यकता असू शकते. उदाहरणार्थ, तुम्हाला वार्षिक सुट्ट्या घ्यायच्या आहेत, सेवानिवृत्तीसाठी बचत करायची आहे आणि तुमच्या मुलाच्या महाविद्यालयीन खर्चाची भरपाई करायची आहे, समजा, तुम्हाला या प्रत्येक उद्दिष्टासाठी नियोजन करण्यात मदत करणारे उद्दिष्ट आणि वेळेच्या मर्यादेनुसार तुम्हाला वेगवेगळ्या म्युच्युअल फंड गुंतवणुकीची आवश्यकता असू शकते. शंका असल्यास, तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला घ्या.

4) दीर्घकालीन कामगिरी
दीर्घकालीन, उत्तम वैविध्यपूर्ण पोर्टफोलिओमध्ये स्थिर गुंतवणुकीचा अनुभव प्रदान करण्याची क्षमता असू शकते आणि तो बाजारातील अस्थिरतेला तोंड देण्यासाठी अधिक चांगल्या स्थितीत असू शकतो.

5) वेळेची बचत आणि सोयीस्कर
वैविध्यपूर्ण पोर्टफोलिओ तुम्हाला वेळेची बचत करण्यास देखील मदत करू शकतात कारण तुम्हाला प्रत्येक गुंतवणुकीचे वैयक्तिकरित्या निरीक्षण करण्याची गरज नाही. त्याऐवजी, तुम्हाला फक्त पोर्टफोलिओच्या कार्यक्षमतेवर लक्ष ठेवण्याची आणि आवश्यक समायोजने करण्याची आवश्यकता आहे. आवश्यक असल्यास, तुम्ही तुमच्या म्युच्युअल फंड वितरकाचा सल्ला घेऊ शकता.

निष्कर्ष
जोखीम व्यवस्थापित करण्यासाठी आणि जास्तीत जास्त परतावा मिळवू पाहणाऱ्या कोणत्याही गुंतवणूकदारासाठी पोर्टफोलिओ वैविध्यता महत्त्वपूर्ण आहे. अर्थव्यवस्थेतील विविध मालमत्ता वर्ग आणि क्षेत्रांना एक्सपोजर प्रदान करणाऱ्या विविध म्युच्युअल फंड योजनांमध्ये गुंतवणूक केल्याने बाजारातील चढउतार आणि आर्थिक अनिश्चितता यांचा प्रभाव कमी होतो आणि दीर्घकालीन आर्थिक उद्दिष्टे साध्य करण्याची शक्यता वाढते.

अस्वीकरण

एएमएफआय म्युच्युअल फंड योजनांच्या विविध प्रवर्गांबद्दलची वेबसाइटवर वितरित माहिती देण्याच्या हेतुकरिता, म्युच्युअल फंड्सविषयी एक वित्तीय उत्पादन प्रवर्ग म्हणून जागृती निर्माण करण्यासाठी आहे आणि कोणत्याही विक्री प्रचारासाठी नाही किंवा व्यवसायाच्या शिफारससाठी नाही.

येथे दिलेला मजकूर एएमएफआय द्वारे जाहीररीत्या उपलब्ध माहितीच्या, अंतर्गत स्रोतांच्या आणि इतर त्रयस्थ स्रोतांच्या आधारे तयार करण्यात आला असून विश्वसनीय मानला जातो. परंतु, अशा माहितीच्या अचूकतेविषयी एएमएफआय हमी देऊ शकत नाही, तिच्या पूर्णत्वाविषयी आश्वासन देऊ शकत नाही किंवा ही माहिती बदलणार नाही असे वचन देऊ शकत नाही.

सदर मजकूर वैयक्तिक गुंतवणूकदाराची उद्दिष्टे, जोखीम पत्करण्याची क्षमता किंवा आर्थिक गरजा किंवा परिस्थिती किंवा येथे वर्णिलेल्या म्युच्युअल फंड उत्पादनांची अनुकूलता विचारात घेत नाही. म्हणूनच, गुंतवणूकदारांना आम्ही सल्ला देतो की त्यांनी त्यांच्या व्यावसायिक गुंतवणूकदार सल्लागारांचा / समुपदेशकांचा / कर सल्लागारांचा ह्या संदर्भात गुंतवणुकीसाठीचा सल्ला घ्यावा.

म्युच्युअल फंड योजना ही ठेव योजना नसते आणि म्युच्युअल फंडद्वारे किंवा त्याच्या एएमसीद्वारे तशा बंधनकृत, हमीकृत किंवा विमेकृत नसते. त्यामध्ये अंतर्भूत गुंतवणुकांच्या स्वरूपामुळे, म्युच्युअल फंडमधून मिळणाऱ्या उत्पन्नाची किंवा संभाव्य उत्पन्नाची हमी देता येत नाही.

म्युच्युअल फंडातील गुंतवणूक ही बाजारातील जोखीमीच्या अधीन आहेत, योजनेसंबंधित सर्व दस्तऐवज काळजीपूर्वक वाचावेत.

285
मी गुंतवणूक करण्यासाठी तयार आहे