एफएमपी (FMP) म्हणजे काय आणि मी त्यांत गुंतवणूक का केली पाहिजे?

Video

म्युच्युअल फंड सही आहे?

फिक्स मॅच्युरिटी प्लॅन म्हणजेच स्थिर मुदत-समाप्ती प्लॅन (FMP) या अशा क्लोज्ड एंड स्कीम असतात ज्यात मुदत ठेवीप्रमाणे मुदत समाप्तीची तारीख दिलेली असते. पण मुदत ठेवी आणि FMP यांत फार फरक असतो कारण FMP मार्केटमध्ये चालणाऱ्या अशा रोख्यांमध्ये गुंतवणूक करतात ज्यांची पूर्तता स्किमच्या मुदतीप्रमाणे होते, जसे सर्टिफिकेट ऑफ डिपॉझिट (CD), कमर्शियल पेपर (CP), इतर रोखे बाजारातील रोखे, कॉर्पोरेट बाँड, प्रतिष्ठित कंपनीचे नॉन-कन्व्हर्टिबल डिबेंचर (NCD) किंवा शासकीय रोखे. तसेच, मुदत ठेवीच्या विपरीत, FMP मध्ये परताव्याच्या दराची गॅरंटी नसते.

फंडच्या मुदतीप्रमाणेच रोख्यांची मुदत असून क्लोज्ड एंड स्कीम असल्यामुळे FMP मधून पाहिजे तेव्हा रोख रक्कम काढता येत नाही आणि ओपन एंड डेब्ट फंडच्या तुलनेत व्याज दराची जोखीमसुद्धा कमी असते. जर आपल्याला आपला पैसा काही विशिष्ट मुदतीसाठी गुंतवायचा असले तर FMP आपल्यासाठी योग्य पर्याय असू शकतो. मुदत ठेवींच्या तुलनेत FMP अधिक कर-कार्यक्षम असतात कारण यात इंडेक्सेशनचा फायदा मिळतो कारण FMP पासून मिळणारा परतावा चलनवाढीसाठी समायोजित केला जातो आणि त्यानंतर त्यावर कर आकारला जातो. डेब्ट फंडांसाठी 3 वर्षांच्या कालावधीनंतर इंडेक्सेशनच्या फायद्यासह 20% दीर्घ-कालीन कॅपिटल गेन्स कर लागतो त्यामुळे तेवढ्या मुदतीच्या मुदत ठेवीच्या तुलनेत FMP कमी खर्चाच्या असतात.  

जर आपल्याला सुट्टी, मुलांचे कॉलेजसाठी किंवा गृहकर्जाचे डाउन पेमेंट अशा पुढच्या तीन ते पाच वर्षांमध्ये होणाऱ्या खर्चासाठी पैसे वेगळे ठेवायचे असतील, तर त्यासाठी आपण ते पैसे FMP मध्ये गुंतवू शकता ज्याची मुदत तुमच्या उद्दिष्टाच्या अनुरूप असेल. जर आपली अशी काही गरज नसेल आणि आपल्याला वाटत असेल की आपली बचत अशीच गरज नसताना खर्च होईल, तरीसुद्धा आपण आपली बचत काही काळ सुरक्षित ठेवण्यासाठी FMP मध्ये गुंतवणूक करू शकता कारण FMP साधारणपणे एक महिना ते पाच वर्षे एवढ्या मुदतीच्या असतात.

454
मी गुंतवणूक करण्यासाठी तयार आहे