मिड-कॅप आणि स्मॉल-कॅप फंड्समध्ये काय फरक आहे?

मिड-कॅप आणि स्मॉल-कॅप फंड्समध्ये काय फरक आहे?

म्युच्युअल फंड सही आहे?

जर आपल्याला असे वाटत असेल की मिड-कॅप आणि स्मॉल-कॅप फंड्स एकसारखेच असतात, तर आपल्याला सेबीचे ऑक्टोबर 2017 मध्ये जारी केलेले आणि जून 2018 पासून लागू झालेले प्रॉडक्ट कॅटेगरायझेशन सर्क्युलर वाचलेच पाहिजे. हे दोन निरनिराळ्या प्रकारचे म्युच्युअल फंड आहेत जे मार्केट साईझ प्रमाणे वेगवेगळ्या प्रकारच्या कंपनींमध्ये गुंतवणूक करतात आणि त्यामुळे त्यांचा जोखीम-परतावा प्रोफाइल निराळा असतो.

भारतात निरनिराळ्या स्टॉक एक्सचेंजवर सार्वजनिक लिस्टिंग केलेल्या अनेक कंपनी आहेत. मिड-कॅप म्हणजे मार्केट कॅपिटलायझेशन प्रमाणे भारतातील सार्वजिनक लिस्टिंग केलेल्या कंपनींपैकी टॉप 101 पासून 250 पर्यंतच्या कंपन्या (मार्केट कॅपिटलायझेशन = सार्वजनिकरीत्या उपलब्ध शेअर्सची संख्या * एका शेअरची किंमत). तसेच क्रमांक 251 पासून पुढे असलेल्या कंपनींना स्मॉल कॅप म्हटले जाते.

मिड-कॅप फंड अशा मिड-कॅप कंपनींमध्ये गुंतवणूक करतात ज्यांची प्रगति करण्याची शक्यता अधिक असते पण स्मॉल कॅप कंपनींप्रमाणे अधिक जोखीम नसतो कारण या कंपनींमध्ये एक निश्चित प्रमाणात स्थिरता आणि क्षमता आलेली असते. मिड-कॅप म्युच्युअल फंड्सबद्दल अधिक माहितीसाठी आपण आमचा हा लेख वाचू शकता :
mutualfundssahihai.com/mr/what-are-mid-cap-funds

स्मॉल-कॅप फंड अशा स्मॉल-कॅप कंपनींमध्ये गुंतवणूक करतो ज्या सध्या चांगली प्रगति करीत आहेत पण गुंतवणूक अधिक जोखमीची आहे. अधिक स्थिर लार्ज-कॅप स्टॉक्सच्या विपरीत, स्मॉल-कॅप स्टॉक्समध्ये चढ-उतार होण्याची शक्यता फार अधिक असते. अशा प्रकारे मिड-कॅप फंड्सचा परतावा लार्ज-कॅप फंडपेक्षा अधिक असण्याची शक्यता असते, आणि त्यांत स्मॉल-कॅप फंड सारखी अधिक जोखीम नसते. तरीही त्यांत लार्ज-कॅप फंड्सपेक्षा अधिक जोखीम असतेच.

मिड कॅप आणि स्मॉल कॅप दोन्ही प्रकारचे फंड कमी किंवा मध्यम कालावधीसाठी अधिक जोखमीचे असतात कारण त्यांतील स्टॉक्स तसे असतात. हे फंड तरुण गुंतवणूकदारांसाठी योग्य आहेत आणि ते आपल्या दीर्घ कालावधीच्या उद्दिष्टांसाठी, जसे रिटायरमेंट, मुलांचे शिक्षण वगैरे साठी यांचा वापर करू शकतात कारण 5-7 वर्षांसाठी या फंड्समधील चढ-उतार ते सहन करू शकतात. या चढ-उतारांचे कारण असे आहे की ब्ल्यूचिप स्टॉक्सच्या विपरीत अशा फंड्सच्या पोर्टफोलिओमधील स्टॉक्सची प्रगति नुकतीच सुरू झालेली असते आणि ते ब्ल्यूचिप स्टॉक्सप्रमाणे स्थिर झालेले नसतात.

पण याचा अर्थ असा मुळीच नाही की विशीतल्या किंवा तिशीतल्या सर्व तरुण गुंतवणूकदारांनी आपल्या पोर्टफोलिओमध्ये हे फंड नक्कीच ठेवावेत. जोखीम पत्करण्याची क्षमता कमी असलेल्या तरुण गुंतवणूकदारांसाठी अधिक स्थिर असे लार्ज-कॅप फंड योग्य असू शकतात किंवा ते असे मल्टी कॅप फंड निवडू शकतात ज्यांत लार्ज कॅप, मिड कॅप आणि स्मॉल कॅप सम प्रमाणात असतील.
 

453
मी गुंतवणूक करण्यासाठी तयार आहे