मनी मार्केट फंड म्हणजे काय?

मनी मार्केट फंड म्हणजे काय? zoom-icon

म्युच्युअल फंड सही आहे?

मनी मार्केट फंड्स हे एक प्रकारचे म्युचूअल फंड असतात जे प्रामुख्याने एक वर्षाच्या आत परिपक्व होणार्‍या मनी मार्केट साधनांमध्ये गुंतवणूक करतात. मनी मार्केट म्हणजे अतिशय कमी कालावधीच्या निश्चित-उत्पन्नाच्या साधनांबाबत व्यवहार करणारा वित्तीय बाजार. मनी मार्केट फंड्समधील विशिष्ट भागीदार हे बँका, संस्थात्मक गुंतवणूकदार, कॉर्पोरेशन्स, इतर वित्तीय संस्था, आणि अधिक संस्था देखील असतात. 

मनी मार्केट फंडमध्ये विशेषकरून काही वैशिष्ट्ये दिसून येतात जसे की कमी गुंतवणूक कालावधी, उच्च तरलता, कमी व्याजदर, आणि सापेक्षतेने कमी उत्पन्न. 

मनी मार्केट फंड्स हे 1 वर्ष किंवा त्यापेक्षा कमी कालावधीसाठी गुंतवणूक करत असल्यामुळे, उत्तम परतावे आणि जोखीम नियंत्रणात ठेवण्यासाठी कालावधी बदलत असतात. 

जास्तकरून, हे फंड्स इतर कोणत्याही म्युचूअल फंड्सप्रमाणेच कार्य करतात, मात्र त्यांची रचना अशाप्रकारे करण्यात आली आहे ज्याद्वारे त्यांची जोखीम नियंत्रणात ठेवतानाच देयकाच्या कालावधीमध्ये बदल करताना फंड व्यवस्थापकांना उच्च परतावे प्राप्त करून देण्याची क्षमता प्रदान करतात. 

मनी मार्केट फंडची प्रमुख वैशिष्ट्ये खालीलप्रमाणे आहेत:

त्यांना कमी परिपक्वता कालावधी असतो: मनी मार्केट फंड्स हे फंडच्या प्रकारानुसार एक दिवसापासून वर्षापर्यंतचे असतात.

त्यांचे व्याजदर कमी असतात: निश्चित-उत्पन्न असलेल्या सिक्युरिटीजच्या व्याजदरातील संवेदनशीलतेचा त्यांच्या परिपक्वता कालावधीशी थेट संबंध असतो. जेवढी जास्त परिपक्वता, तेवढा जास्त व्याजदर, आणि याउलट.

ते सर्वाधिक तरल असतात: ते उच्च पातळीवरील तरलता प्रदान करतात कारण ते तरल आणि सुरक्षित डेट-आधारित असेट्समध्ये गुंतवणूक करतात.

कमी परतावे: जेवढी जास्त परिपक्वता, तेवढे जास्त निश्चित-उत्पन्नाच्या सिक्युरिटीजमधून परतावे. जेवढी कमी परिपक्वता, तेवढे कमी निश्चित-उत्पन्नाच्या सिक्युरिटीजचे परतावे. मनी मार्केट फंड्सच्या परिपक्वता -एनसीडी (अपरिवर्तनीय कर्जरोखा), जी-बॉन्ड्स, आणि आणखीन बर्‍याच गोष्टींच्या तुलनेत कमी असल्यामुळे, त्यांचे उत्पन्न अधिक कालावधीच्या सिक्युरिटीजपेक्षा कमी आहे.

इतर गुंतवणुकीच्या पर्यायांप्रमाणे, मनी मार्केट फंड्सचे देखील काही फायदे आणि तोटे आहेत आणि त्यांच्यामध्ये गुंतवणूक करण्याअगोदर ते विचारात घेतले पाहिजेत. आणि, मनी मार्केट फंड्स हे दीर्घ-काळ गुंतवणुकीसाठी योग्य नाही, मात्र केवळ कमी कालावधीसाठी गुंतवणूक करू इच्छित असलेल्या व्यक्तींसाठी ते एक चांगला गुंतवणुकीचा पर्याय ठरू शकतात. 

अस्वीकरण

म्युच्युअल फंडातील गुंतवणूक ही बाजारातील जोखीमीच्या अधीन आहेत, योजनेसंबंधित सर्व दस्तऐवज काळजीपूर्वक वाचावेत.

285
मी गुंतवणूक करण्यासाठी तयार आहे