इक्विटी म्युच्युअल फंड्सच्या तुलनेत डेब्ट फंड्स कमी परतावा का देतात?

इक्विटी म्युच्युअल फंड्सच्या तुलनेत डेब्ट फंड्स कमी परतावा का देतात? zoom-icon

म्युच्युअल फंड सही आहे?

म्युच्युअल फंड्स वरील परतावा हा गुंतवणूक कोणत्या प्रकारची आहे आणि त्या गुंतवणुकीमध्ये जोखीम कशाप्रकारची आहे त्यावर अवलंबून असतो. केकची चव ही सामोशाच्या चवीपेक्षा वेगळी असते कारण दोन्ही वेगवेगळ्या घटकांपासून बनवलेले असतात आणि वेगळ्या पद्धतीने बनवलेले असतात. तसेच, इक्विटी आणि फिक्स्ड इन्कम फंड्स हे ज्या प्रकारची सिक्युरिटी त्यांचे पोर्टफोलिओ तयार करतात आणि हे पोर्टफोलिओ त्यांचे परतावे कशा प्रकारे मिळवतात, त्यानुसार ते वेगवेगळ्या प्रकारचा परतावा देतात. 

फिक्स्ड इन्कम फंड्स हे व्याज देऊ करणा-या सिक्युरिटीज मध्ये गुंतवणूक करतात जसे की बॉन्ड्स, डिबेन्चर्स आणि रोखे बाजार उपकरणे (मनी मार्केट इन्स्ट्रुमेंटस). ह्या म्युच्युअल फंडामध्ये ह्या सिक्युरीटीज नियमित कालावधीमध्ये निश्चित व्याज देण्याची हमी देतात. हा व्याजदार बाजारात चालू असणा-या व्याजदाराच्या जवळपास जाणारा असतो. त्यामुळे ह्या सिक्युरिटीज जारी करणारे कदाचित त्यांच वचने पूर्ण करायला अयशस्वी ठरले, ते बाजारात चालू असलेल्या व्याजदरापेक्षा अधिक दर ठराविक कालावधीने ह्या गुंतवणुकीवरील नुकसान भरपाई म्हणून देण्याची हमी देतात. इतर रुकी कंपनीपेक्षा एखादी प्रस्थापित कॉर्पोरेट आपल्याला त्यांच्या बॉन्डसवर कमी व्याजदर देईल कारण नवीन कंपनीपेक्षा ह्या बॉन्डसवर अधिक क्रेडीट रेटींग असते.

ह्या गुंतवणुकीवरचे परतावे हे थेट जोखिमिशी जोडलेले असतात. सामान्यतः डेब्ट सिक्युरिटीज या इक्विटीपेक्षा कमी जोखमीच्या समजल्या जातात. त्यामुळे, फिक्स इन्कम फंड्स सारख्या कमी जोखीम असलेल्या गुंतवणुकीमध्ये या इक्विटी फंड्सच्या तुलनेत कमी परतावा दिला जातो.

457
मी गुंतवणूक करण्यासाठी तयार आहे