म्युच्युअल फंड आपल्याला पासबुक देतात का?

म्युच्युअल फंड आपल्याला पासबुक देतात का?

म्युच्युअल फंड सही आहे?

बँका आणि काही अल्प बचत योजना जरी पासबुक देत असल्या, तरीही म्युच्युअल फंड पासबुक देत नाहीत, त्याऐवजी ते अकाउंट स्टेटमेंट देतात. पासबुकचे मुख्य उद्दिष्ट असते बँकेसोबत झालेल्या आपल्या सर्व व्यवहाराची माहिती ठेवणे: पैसे जमा करणे, पैसे काढणे, व्याज जमा होणे इत्यादी. म्युच्यु्अल फंडच्या स्किममध्ये सुद्धा अशा प्रकारचे व्यवहार असू शकतात: खरेदी, रक्कम काढून घेणे, स्थलांतरण, लाभांशची पुर्नगुंतवणूक इत्यादी. म्युच्युअल फंड स्किम मध्ये असे व्यवहार अकाउंट स्टेटमेंटमध्ये दाखवले जातात.

कुठल्याही स्किममध्ये पहिल्यांदा गुंतवणूक केल्यावर हे अकाउंट स्टेटमेंट दिले जाते. अकाउंट स्टेटमेंटमध्ये सर्व संबंधित तपशील दिलेले असतात: गुंतवणूकदाराचे नाव, पत्ता, संयुक्त खाते असल्यास त्याचा तपशील, गुतंवणुकीची रक्कम, एनएव्हीचा तपशील, मिळालेल्या युनिट इत्यादी. जेव्हाही नवीन व्यवहार केला जातो, तेव्हा अकाउंट स्टेटमेंट अद्ययावत केले जाते आणि गुंतवणूकदाराला त्याची एक प्रत मेल केली जाते. आजच्या डिजिटल युगामध्ये, अनेक गुंतवणूकदार ई-मेलद्वारे स्टेटमेंट मागतात, अशाप्रकारे माहिती घेणे, वाचणे आणि जपून ठेवणे सोयीचे ठरते.

गुंतवणूकदारांना पाहिजे तेव्हा अकाउंट स्टेटमेंटची नक्कल मिळू शकते, यासाठी मालमत्ता व्यवस्थापन कंपनी (AMC) किंवा त्यांच्या निबंधकांशी संपर्क साधावा लागतो. अशा प्रकारे स्किमचे अकाउंट स्टेटमेंट हे पासबुकचे काम करते.

454
मी गुंतवणूक करण्यासाठी तयार आहे