टारगेट मॅच्युरिटी फंडमध्ये गुंतवणूक करण्याचे फायदे काय आहेत?

टारगेट मॅच्युरिटी फंडमध्ये गुंतवणूक करण्याचे फायदे काय आहेत? zoom-icon

म्युच्युअल फंड सही आहे?

गेल्या काही वर्षांत, गुंतवणूकदार चांगल्या टैक्स -एडजस्टेड रिटर्नच्या शोधात मुदत ठेवी, PPF आणि पोस्ट ऑफिस बचत योजनांसारख्या पारंपारिक बचत उत्पादनांपासून डेट फंडाकडे जात आहेत. तरीही, हा बदल करत असताना त्यांना सर्वात अधिक काळजी असते ती परतावा निश्चित नसल्याची आणि गुंतवलेले मुद्दल सुरक्षित असेल किंवा नाही याची. टारगेट मॅच्युरिटी फंड असे निष्क्रिय डेब्ट फंड असतात ज्यांचे फायदे इतर डेब्ट फंड आणि FMP यांच्या तुलनेत अधिक असतात.

टारगेट मॅच्युरिटी फंडचे फायदे बघण्याआधी हे पाहूया की या प्रकारच्या डेब्ट फंडची विविक्षित लक्षणे काय आहेत. टारगेट मॅच्युरिटी फंडच्या मॅच्युरिटीची एक निश्चित तारीख असते आणि याच्या पोर्टफोलिओमधील बाँडची एक्सपायरी डेट फंडच्या मॅच्युरिटीच्या तारखेप्रमाणे असते. त्यामुळे कालावधीप्रमाणे या फंडच्या मॅच्युरिटीसाठी उरलेला वेळ कमी होत असतो. तसेच, पोर्टफोलिओमधील सर्व बाँड मॅच्युरिटीपर्यंत बाळगले जातात.

TMF चा पहिला आणि सर्वात मोठा फायदा म्हणजे व्याज दरांतील बदलांचा यावर फारसा प्रभाव पडत नाही. पोर्टफोलिओ मॅच्युरिटीपर्यंत बाळगला जातो आणि उरलेला वेळ कमी होत असतो त्यामुळे त्यादरम्यान व्याज दरातील चढ-उतारांचा यावर कमी प्रभाव पडतो. दुसरा फायदा म्हणजे इतर डेब्ट फंडांच्या तुलनेत TMF च्या परताव्याचा अंदाज अधिक चांगल्या प्रकारे बांधता येतो कारण पोर्टफोलिओमधील बाँड मॅच्युरिटीपर्यंत बाळगले जातात. यामुळे कुठल्याही वेळी परताव्याची अपेक्षा फंडच्या "मॅच्युरिटी-वर-परतावा” (YTM) प्रमाणेच असते. तिसरा फायदा म्हणजे, निष्क्रिय फंड असल्यामुळे टारगेट मॅच्युरिटी बाँड फंड स्वतःचा पैसा मूलभूत बाँड इंडेक्सप्रमाणेच गुंतवतात. म्हणून या फंडचा पोर्टफोलिओ प्रामुख्याने सरकारी सिक्युरिटीजमध्ये गुंतवला जातो ज्याचा भारतातील बहुतांश बाँड इंडेक्समध्ये समावेश असतो. सध्या TMF ना सरकारी बाँड, PSU बाँड आणि राज्य विकास कर्ज यांमध्येच गुंतवणूक करण्याची परवानगी आहे. यामुळे इतर डेब्ट फंडच्या तुलनेत TMF मधील डिफॉल्ट जोखीम आणि क्रेडिट जोखीम फार कमी असते.

टारगेट मॅच्युरिटी फंड ओपन-एंडेड असल्यामुळे आणि इंडेक्स फंड किंवा ETF प्रमाणे उपलब्ध असल्यामुळे त्यांत विशेषकरून FMP च्या तुलनेत लिक्विडिटी अधिक असते. तसेच, त्यांची मॅच्युरिटी प्रोफाइल सुद्धा इतरांच्या तुलनेत अधिक फ्लेक्सिबल असते ज्यामुळे गुंतवणूकदारांना असा फंड निवडता येतो ज्याच्या मॅच्युरिटीची तारीख त्यांच्या गुंतवणुकीच्या कालावधीप्रमाणे असेल. काही काळ गुंतवणूक करून ठेवणारे असे गुंतवणूकदार ज्यांना स्थिर परतावा अपेक्षित आहे, त्यांनी स्वतःच्या डेब्ट फंड पोर्टफोलिओसाठी टारगेट मॅच्युरिटी डेब्ट इंडेक्स फंड किंवा टारगेट मॅच्युरिटी ETF चा विचार करावा.

454
मी गुंतवणूक करण्यासाठी तयार आहे