ग्रोथ आणि लाभांश पर्याय यांच्यामध्ये काय फरक आहे?

Video

म्युच्युअल फंड सही आहे?

काही गुंतवणूकदार म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक यासाठी करतात कारण त्यांना दीर्घ कालावधीमध्ये मालमत्ता निर्मिती करायची असते. ते त्यांच्या करीअरच्या सुरुवाती पासूनच गुंतवणूक सुरू करतात. काही गुंतवणूकदार असेही असतात ज्यांचे रिटायरमेंट जवळ येत असते किंवा त्यांच्याकडे असा एकरकमी पैसा असतो ज्याचा वापर करून त्यांना आपल्या रिटायरमेंटच्या काळासाठी नियमित मिळकतीची गरज असते. अशा दोन अगदी विपरीत गरजांसाठी म्युच्युअल फंड गुंतवणुकीचे दोन पर्याय देतात. 

भविष्यातील वाढ आणि फंडचे मूल्य सुधारित असावे यासाठी असलेला ग्रोथ पर्याय फंडने मिळवलेल्या फायद्याची पुन्हा गुंतवणूक करतो. ग्रोथ पर्यायाचा एनएव्ही अधिक असतो कारण रोख्यांपासून झालेला फायदा पुन्हा स्कीममध्येच गुंतवला जातो आणि चक्रवाढीची शक्ती पहायला मिळते.

डिव्हिडंड प्लॅनमध्ये फंडने मिळवलेला फायदा फंड व्यवस्थापकाच्या विवेकानुसार वेळोवेळी डिव्हिडंडच्या रूपाने गुंतवणूकदारांना परत केला जातो. अशा डिव्हिडंडची गॅरंटी नसते, पण याने आपल्या नियमित मिळकतीमध्ये भर घातली जाऊ शकते. डिव्हिडंड प्लॅनमध्ये जर गुतंवणूकदाराने डिव्हिडंड रीइन्व्हेस्टमेंटचा पर्याय निवडला तर त्यांना फंडच्या अधिक यूनिट मिळतात आणि जर त्यांनी डिव्हिडंड पेआउट पर्याय निवडला तर त्यांच्या मिळकतीमध्ये भर पडते.

1 एप्रिल 2020 पासून गुंतवणूकदारांना मिळणारा डिव्हिडंड कर-योग्य आहे. आता गुंतवणूकदारांना म्युच्युअल फंडमधून मिळणाऱ्या डिव्हिडंडवर त्यांच्या सर्वात अधिक टॅक्स स्लॅबप्रमाणे टॅक्स द्यावा लागेल. 

डिव्हिडंडच्या पर्यायामध्ये मिळकत कराच्या तरतुदीचा विचार तर आपल्याला करावाच लागेल, तरीही पर्याय निवडताना लक्षात ठेवायची मुख्य गोष्ट म्हणजे आपली आर्थिक उद्दिष्टे/गरजा.

 

454
मी गुंतवणूक करण्यासाठी तयार आहे