महिलांसाठी आर्थिक स्वातंत्र्याचे महत्त्व का आहे?

महिलांसाठी आर्थिक स्वातंत्र्याचे महत्त्व का आहे?

म्युच्युअल फंड सही आहे?

गेल्या दोन दशकांमध्ये आर्थिक स्वातंत्र्याबद्दल, विशेषकरून महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्याबद्दल बरेच काही लिहीले आणि सांगितले गेले आहे. पण महिलांचे आर्थिक स्वातंत्र्य म्हणजे नक्की काय? याचा अर्थ वेगवेगळ्या महिलांसाठी वेगवेगळा असू शकतो. एखाद्या नोकरी करणाऱ्या महिलेसाठी याचा अर्थ असा असू शकतो की आता तिला स्वतःचे आर्थिक निर्णय स्वतः घेता येतील किंवा आर्थिक दृष्ट्या स्वावलंबी असेल. एखाद्या घर सांभाळणाऱ्या महिलेसाठी याचा अर्थ असा असू शकतो की आता तिला पाहिजे तेव्हा पैसे खर्च करता येतील किंवा अडी-अडचणीच्या वेळी इतरांवर अवलंबून राहण्याची गरज नसेल.  

अगदी मूलभूत स्वरूपात, आर्थिक स्वातंत्र्यामुळे कुठल्याही सामाजिक-आर्थिक स्तराच्या महिलांना अधिक सुरक्षित आणि सन्मानित वाटते. याचा प्रभाव फक्त महिलांवरच पडतो असे नाही, तर त्यांच्या संपूर्ण कुटुंबावर, समाजावर आणि संपूर्ण देशावर सुद्धा पडतो. आर्थिक दृष्ट्या स्वतंत्र महिला म्हणजे अधिक निरोगी, सुरक्षित आणि कमी भेदभाव असलेला पुरोगामी समाज. आर्थिक दृष्ट्या स्वतंत्र महिला त्यांच्या मुलांसमोर एक आदर्श ठेवतात आणि आपल्या समाजामध्ये पाय रोवून असलेले पारंपारिक लिंग-आधारित पूर्वाग्रह कमी करतात. आर्थिक स्वातंत्र्यामुळे महिलांना लवकर रिटायर होता येते आणि त्यांना आयुष्यातील संघर्षानंतर आराम करण्याची आणि आयुष्याचा आनंद उपभोगण्याची संधी मिळते.  

जर महिलांचे आर्थिक स्वातंत्र्य एवढे महत्त्वाचे आहे, तर कुटुंब, समाज आणि शासन या सर्वांनी मदत करण्याआधीच महिला स्वतःची मदत कशाप्रकारे करू शकतात? याचे सोपे उत्तर आहे महिलांनी स्वतःची कमाई आणि शिक्षण किती आहे याचा विचार करण्याऐवजी शिस्तबद्ध गुंतवणूक कशी करावी याचा विचार करावा. एखाद्या व्यक्तीची आर्थिक परिस्थिती किंवा शिक्षण किती किंवा कसे ही असो, जर आपल्या कमाईच्या एका भागाची बचत करून त्याला शिस्तबद्धरीत्या योग्य ठिकाणी गुंतवले नाही, तर नोकरी जाणे, मोठा डॉक्टरी खर्च किंवा घरातील कमावत्या सदस्याचा मृत्यू अशा अडचणीच्या प्रसंगी त्यांना सामोरे जाण्याची क्षमता नेहमीच कमी असेल. 

आज महिला सर्व क्षेत्रांमध्ये चांगले काम करीत आहेत, तरही सर्व कमावत्या महिला आर्थिक दृष्ट्या स्वतंत्र आहेतच असे म्हणता येणार नाही. गुंतवणूक करण्याच्या बाबतीत बहुतांश महिला आजही घरातील पुरुषांवर अवलंबून असतात. तसेच, त्यांची बचत पुरेशी नसू शकते किंवा बचत करीत असल्या तरीही बचतीची योग्य गुंतवणूक होऊन चलनवाढीचा विचार केलेला नसेल. त्यामुळेच महिलांनी म्युच्युअल फंडांचा विचार केला पाहिजे ज्यांत SIP करून शिस्तबद्ध रीतिने दीर्घ कालावधीसाठी गुंतवणूक केली जाऊ शकते. एखाद्या महिलेची कमाई फारच कमी असेल तरीही तिली रु. 500/- दरमहा बचत करून SIP सुरू करता येईल ज्यामुळे तिची आर्थिक स्वातंत्र्याची वाटचाल सुरू होईल. म्हणूनच प्रत्येक महिलेला हे कळणे गरजेचे आहे की म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करणे सोपे आणि सहज करण्यासारखे आहे. 

454
मी गुंतवणूक करण्यासाठी तयार आहे