जर म्युच्युअल फंड जोखीमेचे विभाजन करतात, तर त्यांत अधिक जोखीम असते असे का मानले जाते?

Video

म्युच्युअल फंड सही आहे?

म्युच्युअल फंड, इक्विटी किंवा डेब्ट रोख्यांमध्ये गुतंवणूक करतात ज्यांची किंमत बाजारातील हालचालींबरोबरकमी-अधिक होत असते. यामुळे त्यांत जोखीम असते कारण फंडचा एनएव्ही त्या फंडच्या पोर्टफोलिओमधील रोख्यांच्या किंमतीवर आधारलेला असतो. पण म्युच्युअल फंड अनेक सेक्टर्सच्या रोख्यांमध्ये गुंतवणूक करतात, त्यामुळे ते बाजारातील धोक्यांचे विभाजन करतात. एक फंड अनेक रोख्यांमध्ये गुंतवणूक करत असल्यामुळे ही जोखीम कमी होते की ते सर्व एकाच दिवशी पडतील. तर, हे खरे आहे की म्युच्युअल फंड जोखीमेचे विभाजन करतात, पण ते जोखीम संपूर्णपणे काढून टाकत नाहीत. फंड व्यवस्थापकाने वापरलेल्या विभाजनामुळे फंडचा बाजारातील धोका त्या विभाजना च्या प्रमाणात कमी होते. एखादा फंड जेवढा अधिक डायव्हर्सिफाइड असेल, तेवढी त्यात जोखीम कमी असते. 

केंद्रित फंड जसे एखादी थीम असलेले फंड किंवा सेक्टरचे फंड यांत मल्टी-कॅप फंड पेक्षा अधिक जोखीम असते कारण एखाद्या सेक्टरसाठी अर्थतंत्रात प्रतिकूल परिस्थिती आल्यावर त्या सेक्टरच्या सर्व कंपनींवर त्याचा प्रभाव पडेल, तर मल्टी-कॅप फंडमध्ये अनेक सेक्टर आणि मार्केट कॅपिटलायझेशन असल्यामुळे त्याचा परिणाम एखाद्या कारच्या अपघातात एयर बँगप्रमाणे होतो ज्याने प्रतिकूल परिस्थितींचा प्रभाव फंडच्या एनएव्ही वर कमी पडतो.

जेव्हा आपण म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करता, तेव्हा फंडच्या सेक्टर वितरणात विभाजन किती आहे ते पहा. आपल्या जोखीम पत्करण्याच्या क्षमतेच्या आधारावर योग्य विभाजना असलेला एखादा फंड निवडा.

454
475
मी गुंतवणूक करण्यासाठी तयार आहे