माझ्या गुंतवणुकीवर डीडीटी (लाभांश वितरण कर)चा कसा परिणाम होतो?

माझ्या गुंतवणुकीवर डीडीटी (लाभांश वितरण कर)चा कसा परिणाम होतो? zoom-icon
म्युच्युअल फंड कैलकुलेटर

म्युच्युअल फंड्स सही है??

सध्या गुंतवणूकदारांसाठी म्युच्युअल फंड्स मधून मिळणारा डिव्हीडंट(लाभांश) हा करमुक्त आहे. गुंतवणूकदारांना त्यांच्या म्युच्युअल फंड्स मधील गुंतवणुकीतून मिळणा-या लाभांश उत्पन्नावर कर भरावा लागत नाही. फंड हाऊस निव्वळ वितरणीय अतिरिक्त निधीचा (नेट डिस्ट्रीब्युटेबल सरप्लस) हिशेब करण्यासाठी वितरणीय अतिरिक्त निधीतून (फायदा) लाभांश वितरक कर (डीडीटी) वजा करते. ज्या गुंतवणूकदारांनी लाभांशाचा पर्याय निवडला आहे त्या गुंतवणूकदारांकडे असलेल्या युनिट्सच्या प्रमाणात ही रक्कम विभागली जाते.

जर गुंतवणूकदाराने लाभांशाचा पर्याय निवडला नसेल पण ग्रोथ हा पर्याय निवडला असेल तर त्याला डीडीटी लागू होत नाही. अशा प्रकारामध्ये, फंडने मिळवलेला नफा (यालाच वितरणीय अतिरिक्त निधी असे देखील म्हणतात) फंडच्या मूळ मालमत्तेच्या वाढीसाठी पुन्हा गुंतवला जातो. त्यामुळे, ग्रोथ स्किम मधील गुंतवणूकदाराने जरी युनिट्सची संख्या तेवढीच ठेवली तरी त्याला युनिट्सच्या एनएव्हीमध्ये वाढ झाल्याचे दिसून येईल. ग्रोथ पर्याय घेतलेल्या गुंतवणूकदारांना दीर्घकाळ चक्रवाढीचा फायदा मिळतो कारण हा नफा पुन्हा फंड मध्येच गुंतवला जातो. 

लाभांश (डिव्हिडंट)पुर्नगुंतवणूक पर्यायामध्ये गुंतवणूकदाराला फंडने घोषित केलेला लाभांश पुन्हा गुंतवता येतो, पण ही पुर्नगुंतवणूक केलेली लाभांशाची रक्कम ही ग्रोथ पर्यायातील गुंतवणूकदारांना मिळत असलेल्या एनएव्हीपेक्षा कमी असते कारण सगळे लाभांश हे डीडीटी वजा केल्यानंतरच घोषित केले जातात. जर आपण दीर्घकालीन गुंतवणूकदार असाल तर डिव्हिडंड रिइनव्हेस्टमेंट (लाभांश पुर्नगुंतवणूकी) पेक्षा ग्रोथ पर्याय निवडा.

454
मी गुंतवणूक करण्यासाठी तयार आहे