म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करण्याआधी कोणत्या प्रकारची माहिती आणि जोखमीचे घटक जाणून घेतले पाहिजेत?

म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करण्याआधी कुठल्या प्रकारची माहिती आणि जोखमीचे घटक जाणून घेतले पाहिजेत?

म्युच्युअल फंड सही आहे?

आपल्या पोर्टफोलिओमध्ये इक्विटी फंड दोन टप्प्यामध्ये निवडता येतो. पहिला टप्पा आपल्या विषयी आहे आणि ज्यामध्ये इक्विटी म्युच्युअल फंडची गरज आहे का, कुठल्या आर्थिक उद्दिष्टासाठी आहे आणि त्यासाठी किती कालावधी लागणार आहे, इक्विटी फंड गुंतवणूक कुठल्या प्रकारची असणार आहे आणि जोखीम पत्करण्याची आपली मर्यादा किती हे सर्व आधी ठरवले जाते. या सर्व बाबी ठरवल्यानंतर, पुढील पाऊल म्हणजे दुसऱ्या टप्प्यामध्ये उपलब्ध असलेल्या वेगवेगळ्या फंड्सपैकी योग्य फंड निवडणे.

अशा प्रकारे दुसऱ्या टप्प्यामध्ये सर्व फंड्सपैकी योग्य फंड निवडण्यासाठी थोडी आकडेवारी पहावी लागते आणि त्यासाठी फंड्सची माहिती काढून जोखमीच्या घटकांचे विश्लेषण केले जाते. फंडचा पोर्टफोलिओ, फंड किती जुना आहे, फंड व्यवस्थापक, खर्चाचे प्रमाण, फंडचा बेंचमार्क आणि दीर्घ कालावधीमध्ये फंडने बेंचमार्कच्या अनुषंगाने कशी कामगिरी केली आहे हे सर्व पहाणे गरजेचे असते.

पोर्टफोलिओचा आढावा घेताना याकडे लक्ष द्या की सेक्टर आणि स्टॉकची निवड या बाबतीत त्यात कितीसे डायव्हर्सिफिकेशन आहे. याचा अंदाज घेण्यासाठी आपण फंडचे टॉप 10 सेक्टर आणि स्टॉक होल्डिंग पाहू शकता. फंड केव्हापासून काम करीत आहे हे पहाताना आपल्याला कळते की या फंडने किती आर्थिक चढ-उतार पाहिले आहेत. मार्केटमध्ये तेजी असताना बहुतांश फंड चांगली कामगिरी करतात, पण तेजी आणि मंदी दोन्हीमध्ये फंडची कामगिरी पाहिल्याने त्याच्या पोर्टफोलिओची खरी ताकद कळते. फंड व्यवस्थापकाची कामगिरी फंडच्या कामगिरीशीच निगडित असते. त्याच फंड व्यवस्थापकाच्या इतर फंड्सकडे पाहून त्या व्यवस्थापकाच्या कामगिरीचा चांगला अंदाज घेता येतो.

खर्चाचे गुणोत्तर(एक्सपेंस रेशियो) हे इंडिकेटर दर्शवते की फंडचे व्यवस्थापन किती चांगल्या प्रकारे केले जात आहे, जे फंडच्या कामगिरीपेक्ष्या वेगळे आहे. खर्चाचे गुणोत्तर जेवढे कमी असेल तेवढाच गुंतवणूकदाराचा फायदा अधिक असेल.

यानंतर इक्विटी फंडच्या जोखमीच्या घटकांकडे पाहूया. हे आहेत स्टैंडर्ड डेविएशन आणि बीटा. स्टैंडर्ड डेविएशनमुळे हे कळते की फंडच्या परताव्यामध्ये चढ-उताराचे प्रमाण किती आहे किंवा परताव्यामध्ये किती चढ-उताराची अपेक्षा करावी. स्टैंडर्ड डेविएशन अधिक असल्यावर आपण त्या फंडच्या परताव्यामध्ये अधिक चढ-उताराची अपेक्षा करू शकता, म्हणजेच फंडचा परतावा दोन्हीकडे (पॉसिटीव आणि निगेटिव) फार वर-खाली होण्याची शक्ता असते. बीटा इंडिकेटरमुळे फंडच्या परताव्याचा मार्केटच्या चढ-उताराशी संबंध कळतो. बीटा 1 पेक्षा अधिक असल्यास फंडचा एनएव्ही मार्केटच्या चढ-उतारापेक्षा अधिक संवेदनक्षम आहे असे कळते. म्हणजेच मार्केट चढल्यावर फंडचा एनएव्ही अधिक वर जाईल आणि मार्केट पडल्यावर फंडचा एनएव्ही अधिक खाली येईल. बीटा 1 असल्यास फंडचा एनएव्ही आणि मार्केटचे चढ-उतार साधारण एकसारखेच असतील. कमी जोखीम असलेल्या म्युच्युअल फंड्सचा बीटा साधारणपणे 1 पेक्षा कमी असतो.

फंड्सबद्दल माहिती काढण्यासाठी आणि त्या माहितीचे विश्लेषण करण्यासाठी स्वतः थोडा वेळ काढा किंवा एखाद्या आर्थिक सल्लागाराकडून मार्गदर्शन घ्या. त्यानंतरच आपल्या पोर्टफोलिओसाठी फंडची निवड करा.

453
मी गुंतवणूक करण्यासाठी तयार आहे